अमरावती : शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे कायदे करण्यासाठी आतापर्यंत आपण निवडून पाठवलेले पक्षप्रतिनिधी बदल करू शकले नाहीत. महापालिका, जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य निवडून आल्याशिवाय आमदार, खासदारकीची वाट मोकळी होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख धनंजय पाटील काकडे यांनी दिली.

हेही वाचा >>> …तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल – अजित पवारांचा सूचक इशारा!

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

शेतकरी संघटना स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवणार आहे. शहरी विकासाच्या कामात शेतकरी संघटना महापालिकेतील उमेदवारांना मदत करण्यास तयार आहे. कारण शहरात येणारी मंडळी ही ग्रामीण भागातूनच आलेली आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांसोबत सध्यातरी शेतकरी संघटनेची युती होणार नाही. कारण शेतकरी हिताचे कायदे तयार करणे व शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, या विषयावर ते शेतकरी संघटनेसोबत एकत्र येऊ शकत नाहीत. संघटनेला स्वतःच्या बळावर राजकीय पक्ष विरहित निवडणूक लढावी लागणार आहे. पुढील निवडणुका शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली स्वतंत्रपणे लढण्यात येतील, असेही धनंजय पाटील काकडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती एक पद’ ठरावाची अंमलबजावणी, आमदार विकास ठाकरे यांनी दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

आंबेडकरी चळवळीतील सर्व गट, संभाजी ब्रिगेड तसेच शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सर्व लहान-मोठ्या संघटना, लोक चळवळीतील सर्व लहान गटांनी ही निवडणूक शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढवावी. तरच शेतकऱ्यांना व मजुरांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. या देशात भ्रष्टाचारावरून फक्त राजकीय पक्ष एकमेकांवर केवळ आरोप करतात. सर्वच आमदार-खासदारांचे हिशेब तपासणे आता गरजेचे आहे. या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या घामाने जमा झालेल्या शासन तिजोरीत फक्त चोऱ्या केल्या आहे. भारत देशाला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक जर मतदारांनी आता मिटवला नाही तर तो पुढेही मिटणार नाही. शेतकरी चळवळीला बळकटी आणण्यासाठी, न्याय व हक्कासाठी सर्वांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख धनंजय पाटील काकडे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

Story img Loader