Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary 2025 Celebration LIVE : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला यावरून इतिहास तज्ज्ञांमध्ये वाद होता. सन १६२७ की १६३० असे त्या वादाचे प्रमुख स्वरूप होते. अखेर जेधे शकावली आणि विविध इतर पुराव्यांच्या आधारे फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० यावर २००० साली तत्कालीन राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून राज्यात दोनवेळा शिवजयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी रोजी आणि तिथीनुसार येणाऱ्या तारखेला. त्यानुसार, आज १७ मार्च रोजी तिथीनुसार शिवजंयती असून यासाठी राज्यभर मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसंच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

Live Updates
12:40 (IST) 17 Mar 2025

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजाना उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1901529862231179678

11:49 (IST) 17 Mar 2025

Shivaji Maharaj Temple Bhiwandi Video: छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीत मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, कसं आहे हे मंदिर?

Shivaji Maharaj Temple: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला.

सविस्तर वाचा

11:44 (IST) 17 Mar 2025

Shivjayanti 2025 Live Updates :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल

शिवाजी पार्कात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी

11:17 (IST) 17 Mar 2025
Shivjayanti 2025 Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची चार मोठी आश्वासने, म्हणाले...
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</li>
  • संगमेश्वरला ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना अटक करण्यात आली, तो संगमेश्वरचा वाडाही विकासाकरता घेत आहोत, तिथे स्मारक बांधणार आहोत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • उत्तर प्रदेशच्या सरकारला विनंती केली की आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे कैद कलं होतं, तेही स्मारकाकरता विकास करण्याकरता द्यावे, त्याकरता अर्थसंकल्पात तरतूद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • पानीपतला मराठ्यांनी शौर्य दाखवलं होतं, त्यानंतर १० वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर झेंडा रोवला होता, तिथेही पानीपतला स्मारक बांधणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • 11:12 (IST) 17 Mar 2025

    भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    https://www.youtube.com/live/laQWmm3d6cE?si=YmAf0UkoWCoKl88R

    10:53 (IST) 17 Mar 2025

    शिवजन्मोत्सव साजरा होत असताना शिवनेरीवर मधमाशांचा हल्ला

    शिवनेरीवर कालपासून मधमाशांनी हल्ला केला आहे.

    आजही शिवजन्मोत्सस सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला

    या हल्ल्यात २० ते २५ शिवभक्त जखमी झाले आहेत.

    09:47 (IST) 17 Mar 2025

    विश्लेषण : शिवजयंती तारखेने की तिथीने… काय आहे हा वाद?

    जन्मतिथीचा वाद मिटला पण आता शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यावरून राजकारण सुरूच असते. विशेष म्हणजे शिवजंयती साजरी करण्यावरून नवीन मागणी करत आधी मुंबई काँग्रेसने व आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे.

    सविस्तर वृत्त वाचा

    09:05 (IST) 17 Mar 2025

    तिथीनुसार शिवजंयती निमित्त आमदार आदित्य ठाकरेंनी चेंबूर येथील कार्यक्रमात लावली हजेरी

    https://twitter.com/AUThackeray/status/1901367818874183816

    09:03 (IST) 17 Mar 2025

    किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

    काल रात्रीपासूनच शिवभक्त गडावर जमले असून शिवजंयती साजरी करण्यात आली,

    08:57 (IST) 17 Mar 2025

    "CSMT परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा", ठाकरेंच्या सेनेची मागणी

    "CSMT परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा" यामागणीसाठी अरविंद सावंत आणि त्यांचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जमले आहे. तेथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "औरंगाजेबाचं थडगं लोकांना दिसलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. ही पक्षाची भूमिका नाही. नाहीतर इतिहास कसा कळणार? औरंगजेब खड्ड्यात गेला. शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे सरकारला दिसत नाही का? काल कैलास नांगरेने आत्महत्या केली. शिक्षकानेही आत्महत्या केली. "

    08:33 (IST) 17 Mar 2025

    Shivjayanti 2025 LIVE : शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, "आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे..."

    https://twitter.com/RajThackeray/status/1901460413201715642

    Story img Loader