Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary 2025 Celebration : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला यावरून इतिहास तज्ज्ञांमध्ये वाद होता. सन १६२७ की १६३० असे त्या वादाचे प्रमुख स्वरूप होते. अखेर जेधे शकावली आणि विविध इतर पुराव्यांच्या आधारे फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० यावर २००० साली तत्कालीन राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून राज्यात दोनवेळा शिवजयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी रोजी आणि तिथीनुसार येणाऱ्या तारखेला. त्यानुसार, आज १७ मार्च रोजी तिथीनुसार शिवजंयती असून यासाठी राज्यभर मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसंच, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजाना उद्धव ठाकरेंकडून अभिवादन
भारतीय कामगार सेनेतर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आयोजित शिवजयंती उत्सवास शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित होते. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. pic.twitter.com/mgS32X3QJZ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 17, 2025
Shivaji Maharaj Temple Bhiwandi Video: छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीत मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, कसं आहे हे मंदिर?
Shivaji Maharaj Temple: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला.
Shivjayanti 2025 Live Updates :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल
शिवाजी पार्कात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी
शिवजन्मोत्सव साजरा होत असताना शिवनेरीवर मधमाशांचा हल्ला
शिवनेरीवर कालपासून मधमाशांनी हल्ला केला आहे.
आजही शिवजन्मोत्सस सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला
या हल्ल्यात २० ते २५ शिवभक्त जखमी झाले आहेत.
विश्लेषण : शिवजयंती तारखेने की तिथीने… काय आहे हा वाद?
जन्मतिथीचा वाद मिटला पण आता शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यावरून राजकारण सुरूच असते. विशेष म्हणजे शिवजंयती साजरी करण्यावरून नवीन मागणी करत आधी मुंबई काँग्रेसने व आता भाजपनेही या वादात उडी घेतली आहे.
तिथीनुसार शिवजंयती निमित्त आमदार आदित्य ठाकरेंनी चेंबूर येथील कार्यक्रमात लावली हजेरी
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 16, 2025
'भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून… pic.twitter.com/VUHO5u0ntZ
किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
काल रात्रीपासूनच शिवभक्त गडावर जमले असून शिवजंयती साजरी करण्यात आली,
“CSMT परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा”, ठाकरेंच्या सेनेची मागणी
“CSMT परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा” यामागणीसाठी अरविंद सावंत आणि त्यांचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जमले आहे. तेथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “औरंगाजेबाचं थडगं लोकांना दिसलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. ही पक्षाची भूमिका नाही. नाहीतर इतिहास कसा कळणार? औरंगजेब खड्ड्यात गेला. शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे सरकारला दिसत नाही का? काल कैलास नांगरेने आत्महत्या केली. शिक्षकानेही आत्महत्या केली. “
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवजयंतीच्या शुभे्च्छा
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! pic.twitter.com/KmXiwVNCY2
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 17, 2025
Shivjayanti 2025 LIVE : शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे…”
आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची… pic.twitter.com/DqjnlFJvVh
— Raj Thackeray (@RajThackeray) March 17, 2025