शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहे. शनिवारी ( १ ऑक्टोबर ) बंडखोरी केलेले सर्व आमदार निवडणुकीत पराभूत होतील. फुटून गेलेले कधीच निवडून आले नाही. ते पडले नाहीतर मी हिमालायात जाणार, असे खैरे यांनी म्हटलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे.
“दिल्लीला जाऊन हिमालयातील एक गुहा चंद्रकांत खैरेंसाठी आरक्षित करावी लागणार आहे. एका वर्षाने चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयात जावे लागणार आहे. अरविंद सावंत, विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळं केलं आहे. उद्धव ठाकरे बाप चोरल्याचा आरोप करतात. मात्र, मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उद्धव ठाकरेंच्या तोंडात हे वाक्य शोभत का?,” असा सवालही शहाजी बापू पाटील यांनी विचारला आहे.
हेही वाचा – आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरळीतील शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश
“१९९६ साली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी…”
“राज्यात सत्तातर झाल्याने उद्धव ठाकरे हादरले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांवर सातत्याने गद्दार म्हणून टीका करत आहेत. टीका करणाऱ्या सर्वांना पहिल्याच्या वर्गात दाखल करावे लागेल. १९९६ साली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रस्ताव दिला असेल. कारण महाविकास आघाडी सरकारच्या वेळी त्यांनी लगेच मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला होता,” असेही शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.