पंढरपूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर युवासेनेने गुरुवारी निशाणा साधला होता. ‘काय दारू काय चकणा, काय ते ५० खोके समदं कसं ओके,’ अशी घणाघाती टीका सोलापुरातील युवासेनेने शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती. त्याला आता शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला ५० खोके सोडा, साधी पेटीही बघायला मिळाली नाही. आता विरोधकांना मैदानात उत्तरं देणार, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“माझ्यावर टीका करायला आणि माझी बदनामी करण्यासाठी मातोश्री, शिवेसना भवन येथून आदेश निघत आहेत. मात्र, आपण या टीकेला भीक घालत नाही. हातातील सत्ता गेली असल्याने शिवसेना आक्रमक होत आहे. शिंदे गटातील आमदारांच्या घरावर दगडे फेकायचा त्यांचा डाव होता. पण, असे काही न घडल्याने शिवसेना बिथरली आहे,” अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“सत्तेतून पायउतार झाल्याने राष्ट्रवादी चिडलेली”

राष्ट्रवादी काँग्रेसवरही शहाजीबापू पाटील जोरदार निशाणा साधला आहे. “राष्ट्रवाही हा सत्तेशिवाय राहू न शकणारा पक्ष आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही तत्वाला पायदळी तुडवतात. सत्तेतून पायउतार व्हावं लागल्यानं राष्ट्रवादी चिडलेली आहे. म्हणूनच दोनही पक्षाकडून मला टार्गेट केलं जातं आहे,” असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितंल.

युवासेनेने काय केली होती टीका?

सोलापुरातील माळशिरस येथील युवासेनेने शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात आंदोलन केलं होते. त्यावेळी बॅनरबाजी करत “बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा, ‘काय दारू काय चकणा, काय ते ५० खोके समदं कसं ओके,’ बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल,” अशी टीका युवासेनेने शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती.