राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर दिलं जात आहे. दापोलीमध्ये शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? अशी विचारणा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो…” म्हणत रामदास कदमांचा हल्लाबोल; म्हटले, “बाळासाहेबांच्या आत्म्याला…”

आपल्या मुलाचं करिअर संपवण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात आखल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार रामदास कदम यांनी यावेळी केला. तसंच माँसाहेब कधीही कोणत्या व्यासपीठावर दिसत नव्हत्या, मग रश्मी ठाकरे का दिसतात? अशी विचारणा त्यांनी केली.

काय म्हणाले रामदास कदम –

“बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन पुढे चाल, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत असं ते सांगत असतील. पण आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत? आणि त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत आहे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

“…तर मी व्हिडीओ बाहेर काढणार”, नितीश देशमुख यांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाले ‘मुंबईत फिरणं बंद करुन दाखवाच’

“मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली.

“आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde camp ramdas kadam on uddhav thackeray rashmi thackeray dapoli melava sgy