काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सत्तेत सहभागी होताच अजित पवार गटाच्या नऊ आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली. अजित पवार गटाने अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे, असा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का; कल्याणमध्ये मनसेला मोठं खिंडार

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) काही नेते महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. असे बरेच लोक आहेत. आमचे दोन-तीन जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्याशी याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर संबंधित सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू आहेत.”

हेही वाचा- “साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका

“दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे धमाका सुरू झाला आहे. दसऱ्यातही आपण जोरदार धमाके करतो, उत्साह साजरा करतो. त्यामुळे जसं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ९ मंत्र्यांनी अचानक शपथ घेतली, तसंच कदाचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असंही मंत्री देसाई यांनी पुढे नमूद केलं. शंभूराज देसाई यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction minister shambhuraj desai on sharad pawar faction leaders willing to join mahayuti secret talk rmm
Show comments