मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक काही वेळापूर्वी पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की यंदाही दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जाईल. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्यातील नागरिकांना ही गोड बातमी दिली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार असून यामध्ये दोन नवीन जिन्नसांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

आंनदाचा शिधा या संचात १ किलो साखर, १ लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चासदेखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Story img Loader