औरंगाबादचे शिवसेनेचे(ठाकरे गट) माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम न झाल्याने तो व्यक्ती आता ऋषिकेश खैरेंकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहे. या प्रकरणावरून आता भाजपा आणि शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी खैरे पिता-पुत्रावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील?” असा सवाल शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे.

हेही वाचा – वाझे ते खैरे व्हाया अनिल देशमुख हीच खरी महाविकास आघाडी सरकारची ओळख – भाजपाचे टीकास्त्र!

याशिवाय, “यावरून एक गोष्ट लक्षात आली जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले. युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार? हा एक चर्चेचा विषय ठरतो.” असंही राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे.

भाजपानेही केली आहे टीका –

“वाझे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडीची ओळख आहे. सचिन वाझेंपासून चंद्रकांत खैरेंच्या मुलापर्यंत ज्या पद्धतीने पैशांची लुटालुट या राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली, त्यावरून महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका अर्थाने वसुलीचं सरकार होतं, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group aurangabad district chief rajendra janjal criticizes chandrakant khaire over rishikesh khaireys audio clip case msr