शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात (ठाकरे गटातील) तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केलं.
शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप
विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला होता. व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाले होते. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
शिंदे गटाकडूनही व्हीप जारी
विधानसभा अध्यक्षांची निवडवणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडूनही शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. आमचा व्हिप झुगारून ३९आमदारांनी विरोधात मतदान केलं. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली हे महाराष्ट्राची १३ कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल.” असं शिवसेना नेते शिवसेनेचे नेते सुनील प्रभू म्हणाले.