आमदारकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंढरपुरातील एका सभेत भाजपा नेते प्रवीण दरेकरांकडे इशारा करत शहाजी बापू पाटलांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची मागणी केली आहे. पाटलांनी ही मागणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. शहाजी बापू पाटील या एकच मागणीवर थांबले नाहीत, तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
तिन्ही पक्षांची युती व्हावी, असं शहाजी बापू पाटलांना का वाटतंय?
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’ या डॉयलॉगमुळे प्रकाशझोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. “आपलं झाडी, डोंगार प्रसिद्ध झाल्यामुळे कोकणात गेलं तरी गर्दी, नांदेडमध्ये गेलं तरी गर्दी असते. त्यामुळे मला तुमच्या सारखं विधानपरिषदेवर घेऊन अभिजितला सांगोल्यातून उमेदवारी द्या” असे गुरसाळे येथे पार पडलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमात पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात केलेला नवा प्रयोग जनतेला मान्य – शहाजी पाटील
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजी बापू पाटील आमदार झाले आहेत. देशमुख घराण्याविरोधातील या मोठ्या विजयानंतर विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा शहाजी बापू पाटलांनी व्यक्त केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.