शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अलीकडेच सुषमा अंधारे यांची गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा आयोजित केली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली. तसेच गुलाबराव पाटील दबावतंत्राचा वापर करून आपली सभा रोखू इच्छित आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

अंधारे यांच्या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारेंवर टीकास्र सोडताना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली आहे. त्यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला आहे. जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटलांनी हे विधान केलं आहे.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

हेही वाचा- उपमुख्यमंत्री पद दिल्याने शारिरीक वजनासोबत राजकीय वजनही कमी झालं का? फडणवीसांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर (चित्रपट) कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती. ज्याप्रमाणे एखादा पिक्चर काढण्यासाठी अभिनेत्रीची गरज असते, त्याप्रमाणे यांनाही (ठाकरे गटाला) एखादी बाई पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. ती एक बाई आहे, माणूस असते तर गुलाबराव कोण आहे, हे दाखवलं असतं” अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी टीकास्र सोडलं आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा मूळ प्रस्ताव कुणी दिला? फडणवीसांनी दिलेलं उत्तर ऐकून बसेल धक्का

“या बाईने ज्या देवतांना शिव्या घातल्या. बाळासाहेबांच्या हातात तलवार दिली तर त्यांचे हात थरथर कापतील. उद्धवजी तुम्ही खाली उभं राहा आणि तुमच्या आदित्यला गोविंदा तयार करा, अशी विधानं केली. अशी बाई त्यांना कशी चालते? यापेक्षा आणखी घाण काय असू शकते?” अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.