“मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, अशी टीका शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमच्यासाठी मुंबई दुभती गाय होती. या मुंबईचे तुम्ही लचके तोडले होते. मुंबईत आता शिंदे सरकार करत असलेलं काम आपल्याला का बरं जमलं नाही? २५ वर्षं मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी तुम्ही काय केलंत? तर तुम्ही दोन मातोश्री बांधल्या”, असा हल्लाबोल म्हात्रे यांनी केला आहे.

“मुंबई तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी, पण आमच्यासाठी कर्मभूमी-जन्मभूमी”

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
police issue lookout notice against sindhudurg shivaji statue artist jaydeep apte
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी
married woman Suicide due to abuse and harassment
अत्याचार, छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
ajit pawar
छायाचित्रांना जोडे काय मारता, हिंमत असेल तर समोर या – अजित पवार
Father Arrested for sexual Abusing 10 Year Old Daughter
वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा, काय घडले?
Crime Scene
Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!
News About Akshay Shinde
Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा

“सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे. आपण अनेक गोष्टी करू शकलो नाही, त्या गोष्टी आता होत आहेत, याच्या त्यांना वेदना होत आहेत”, असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. “शिंदे-फडणवीसांचं सरकार उत्तम काम करत आहे. ज्या गोष्टी २५ वर्ष तुम्हाला सुचल्या नाहीत, त्या गोष्टी आज होत आहेत. या सरकारच्या कामाचा धडाका पाहता येत्या अडीच वर्षांमध्ये मुंबईची स्थिती प्रत्येक मुंबईकराला अभिमानास्पद वाटावी, अशी होणार आहे”, असं म्हात्रे म्हणाल्या आहेत.

“मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास”, आदित्य ठाकरेंची टीका; पाच हजार कोटींच्या रस्त्यांवरुनही सरकारवर निशाणा

“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. “पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते रातोरात खड्डेमुक्त होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात जर खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील”, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.