शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता थुंकल्याची घटना घडली होती. भर पत्रकार परिषदेत वाहिन्यांच्या कॅमेरासमोर राऊत यांनी ही कृती केली. संजय राऊतांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवसेना ( शिंदे गट ) नेते विजय शिवतारे यांनीही संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली होती. “उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील,” असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर शुक्रवारी राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकल्यानंतर उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकण्याची कृती केली.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

हेही वाचा : “राऊतांनी पवारांच्या सांगण्यावरून…”, शिवसेना फुटीवरून संजय शिरसाटांचा आरोप; म्हणाले, “सिल्व्हर ओकवर…”

“संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे”

यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “संविधानाने मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. तुम्हाला वाटतं ते म्हणा. पण, संसदीय शब्दांत आणि कृतीमध्ये ते असायला हवे. संजय राऊतांनी केलेली कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम आहे. संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करतो. तसेच, राऊतांची सुरक्षा व्यवस्था तातडीने कमी केली पाहिजे.”

“काळ्या अक्षराने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं नाव लिहिलं जाणार”

“अशा प्रकारची चुकीची कृती करूनही उद्धव ठाकरे गप्प आहेत. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं का नाही? ४० आमदार, खासदार, पक्ष आणि चिन्हही एका मुर्ख माणसामुळे गेलं. खालच्या पातळीला जाऊन निव्वळ प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत प्रचंड नुकसान होणार आहे. इतिहासात काळ्या अक्षराने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं नाव लिहिलं जाणार आहे,” असा घणाघात विजय शिवतारे यांनी केला.

हेही वाचा : “…म्हणून राऊतांची भाषा बदलली”, अजित पवारांवरील टीकेवरून संजय शिरसाटांचा टोला

“हा भोंगा तीन-चार वर्षापासून सुरू आहे”

जीभेच्या त्रासामुळे ती कृती केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. याबद्दल विचारल्या शिवतारेंनी म्हटलं, “संजय राऊत खोट बोलत आहे. हा भोंगा तीन-चार वर्षापासून सुरू आहे. मग चार वर्षात तसा प्रकार घडला नाही. उद्धव ठाकरेंचा प्रश्न विचारल्यावर ती कृती झाली पाहिजे. हा माणूस माथेफिरू आहे. ४० वर्षाची संघटना संजय राऊतांमुळे संपलेली आहे. उद्धव ठाकरेंचं डोळे बंद असून, ते धृतराष्ट्र झाले आहेत. अजूनही त्यांना या माणसाला हाकलता येत नसेल, तर दुर्दैव आहे.”