‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपात ठिणगी पडली आहे. या जाहिरातीवरून भाजपा नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही,’ अशी टीका अनिल बोडेंनी केली आहे. याला शिवसेना ( शिंदे गट ) नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल बोंडे काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपा आणि जनतेने स्वीकारलं आहे. ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटायची. आता शिंदेंना वाटत आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही,” असं अनिल बोडेंनी म्हटलं.

हेही वाचा : “७४ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत”, अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय शिवतारेंचा टोला; म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा चेहरा असून बहुजनांसाठी काम करत आहेत. ओबीसी, मराठा आरक्षण किंवा धनगर समाजासाठीचे निर्णय सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं. मी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फिरताना पाहिलं,” असेही अनिल बोडेंनी सांगितलं.

“टीका कोणी करावी, यालाही महत्व असते”

यावर विजय शिवतारे म्हणाले की, “अनिल बोंडे यांची उंची किती आहे. अनिल बोंडे माझ्याबरोबर मंत्री होते. त्यांची बुद्धी मला माहिती आहे. त्यामुळे अनिल बोडेंनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं असेल, तर दुर्दैवी आहे. टीका कोणी करावी, यालाही महत्व असते. ताकदीच्या माणसाने टीका केली, तर उत्तर नक्की द्यायला हवं. देवेंद्र फडणवीसांच्या जवळील व्यक्ती दाखवण्यासाठी आणि स्वार्थ्यासाठी अशी गैरजबाबदार वक्तव्य करणं, चुकीचं आहे.”

हेही वाचा : “संजय राऊतांविरोधात ४२० ची FIR दाखल करा” धमकी प्रकरणी मयूर शिंदेच्या अटकेनंतर नितेश राणेंची मागणी

“शिंदेबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध”

“अनिल बोंडेंना विचारून युतीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत का? कोण अनिल बोंडे? माणसाने लायकीत राहावं. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो,” अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी खडसावलं आहे.