गेल्या दोन दिवसांपासून एका सर्वेक्षणच्या दाखल्याने दिलेल्या जाहिरातीवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपात कलगीतुरा रंगला आहे. सर्वेक्षणाच्या हवाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा मारला होता. “७४ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत,” असं विधान अजित पवारांनी केलं होतं. याला शिवसेना ( शिंदे गट ) नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार काय म्हणाले?

“सर्वेत लोकांना २६ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं. तर, २३ टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे वाटतात. म्हणजे दोन्हींचा आकडा ५० टक्क्यांपर्यंत जातो. तर, ५० टक्के लोकांना अन्य मुख्यमंत्री व्हावेत, असा त्याचा अर्थ निघतो. तसेच, २६ टक्क्यांचा विचार केला तर, ७४ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको आहे, असाही अर्थ होतो,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : संजय राऊतांना त्यांच्याच कार्यकर्त्याकडून धमकीचा फोन, सुरक्षा आणि लवाजमा वाढवण्यासाठी बनाव रचल्याचा मनसेचा आरोप

“अजित पवार दिशाभूल करत आहेत”

यावर विजय शिवतारे यांनी सांगितलं की, “अजित पवार तोडून-मोडून काहीही बोलत असतात. अजित पवारांनी स्वत:चा सर्वे करून घेतला की नाही माहिती नाही. कारण, सर्वेनुसार अजित पवारांना फक्त ७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. दिशाहीन किंवा दिशाभूल करण्याचा प्रकार अजित पवार करत आहेत.”

हेही वाचा : “तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा…”, जितेंद्र आव्हाडांचा अमेय खोपकरांना टोला; म्हणाले, “लवकर बरा हो!”

“भाजपाचे नेते, कार्यकर्ते नाराज”

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपात तू-तू मैं-मैं सुरू आहे. जाहिरातीवरून भाजपाचे नेते कार्यकर्ते नाराज असल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना करणे योग्य नव्हते. यामुळे नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत,” असं बावनकुळेंनी सांगितलं.