राज्यात अमली पदार्थ तस्करीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. ललित पाटील प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले आहेत. तर, ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये मोठं आंदोलनही छेडण्यात आलं होतं. तसंच, सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी राज्य सरकारला खडेबोल सुनावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मनीषा कायंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाडांचा संशयित ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा मोठा दावा केला. तसंच, विविध संशयित ड्रग्स तस्करांसोबत असलेले आव्हांडांचे फोटोही माध्यमांना दाखवले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. शानू पठाण, सलमान फाळके या ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपींची जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचा संबंध असल्याचं त्या म्हणाल्या.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल

मनीषा कायंदे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी ललित पाटील याला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. २०२० मध्ये तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता आणि आताही असेल. अमली पदार्थ प्रकरणात सात ते आठ नावं समोर आली आहेत. यानंतर मोठं नाव समोर आलं ते कळवा मुंब्रा विभागातून सलमान फाळके याचं. त्याच्याकडे ५४ ग्रॅमच्यावर ड्रग्स सापडलं. त्याशिवाय अजूनही नावे समोर आलीत. शानू पठाण यांचंही नाव पुढे आलं. ड्रग्सप्रकरणी विरोधकांनी रान उठवायचा प्रयत्न केला. दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यावर बेछूट आरोप केले. परंतु, या आरोपांमध्ये कोणतेच धागेदोरे पोलिसांना सापडले नाहीत.”

“परंतु, ड्रग्स प्रकरणात अटक झालेली मंडळी कोणाजवळची आहेत, कोणाशी संबंधित आहेत, कोणाचं प्रोत्साहन, राजकीय पाठबळ आहे का? हे तपासायला हवं. यासाठी काही फोटो याठिकाणी दाखवते”, असं म्हणत मनीषा कायंदे यांनी सलमान फाळके, शानू पठाण (ठामपा विरोधी पक्षनेता) यांचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंसोबतचे फोटो दाखवले. त्या पुढे म्हणाल्या की, “फोटोंमध्ये बरीचशी जवळकी दिसतेय. सुप्रिया सुळे खासदार आहेत. आमच्या सरकारवर त्या रोज उठून आरोप करतात. विश्वप्रवक्ते रोज सकाळी उठून बोलतच असतात. हे फोटो बोलके आहेत. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता तेव्हा दुसऱ्यांच्या घरावर दगडं फेकणं कितपत योग्य आहे. यावर फोटोंबाबत उत्तर द्यावं. सुप्रिया सुळे खासदार आणि संसदरत्न आहेत, त्यांचेही ड्रग्स तस्करांसोबत फोटो आहेत. यावर जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंनी उत्तरं द्यावीत. याचा खुलासा व्हायला हवा”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या.

सलमान फाळके न्यायालयीन कोठडीत

वडाळागावातील छोट्या भाभीला एमडी ड्रग्ज‌चा ठाण्यातून पुरवठा करणाऱ्या सलमान शकील अहमद फाळके याला अटक करण्यात आली असून तो पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.अमली पदार्थ व्यवहारप्रकरणात तो चौधा संशयित आरोपी आहे.