एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापुरात जोरदार टोलेबाजी केली आहे. आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख आहे, असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. ते सोलापुरात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते.

यावेळी त्यांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना उद्देशून म्हटलं की, “आज इथे समोर बघताना मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली. इथे आज अवघा महाराष्ट्र गोळा झाला आहे. आता महाराष्ट्रात कुणीही मागे शिल्लक राहीलं नाही. ही तरुणाई पाहिल्यानंतर, मनात कधी कधी विचार येतो की, देवानं इतक्या लवकर मला म्हातारं का केलं? अजून तरुण असतो तर बरं झालं असतं.”

Manoj Jarange, Parivartan Mahashakt,
मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीत यावे, संभाजीराजे भोसले यांची भूमिका
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Clash between MLA Ravi Rana and MLA Bachu Kadu over Rajkumar Patel in Amravati district
“राजकुमार पटेलांना बच्‍चू कडूंनीच शिवसेनेत पाठवले,” रवी राणांचा गौप्‍यस्‍फोट
Bhanudas Murkute arrested, Ahmednagar,
अहमदनगर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक
Dipesh Mhatre, Shinde supporter, Dombivli,
डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
Devendra Fadnavis urged Chhatrapati Sambhaji Raje to protest Congress regarding Shiva memorial
शिव स्मारकबद्दल संभाजी राजे छत्रपतींनी काँग्रेसचाही निषेध करावा; देवेंद्र फडणवीस
Ramraje Naik Nimbalkar, Ranjit Singh Naik Nimbalkar,
तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू; रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान
Rajiv Patil is preparing to contest the assembly elections 2024 from BJP Vasai Print politics news
वसईत ठाकूरांचे शिलेदार राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर

हेही वाचा- नाराज असल्याने अजित पवार भाषणादरम्यान उठून गेले? जयंत पाटलांनी स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…

आपल्या महाविद्यालयीन जीवनातील किस्सा सांगताना शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, “मी कॉलेजला असताना तिथे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलं मुली होते. तिथे सातारा सैनिक स्कूलमधून शिकून आलेल्या पोरांची वेगळीच फळी होती. ही पोरं सर्वच वर्गात असायची. हॉकी, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळ फक्त सैनिकी स्कूलमधून आलेली पोरंच खेळायची. आम्ही मात्र कबड्डी, खो-खोसारखे गावरान खेळ खेळायचो. सैनिकी स्कूलमधील मुलं बास्केटबॉल खेळताना आम्ही लांब उभं राहून त्यांना पाहायचो. ते बास्केटमध्ये बॉल कसं टाकतात, हे पाहून नवलाई वाटायची.”

हेही वाचा“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्याच नावावर…” अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अजित पवारांचं विधान

त्या खेळाचं वैशिष्ट्ये त्यावेळी मला वाटलेलं, बास्केटबॉल खेळताना खेळाडू बॉलकडे बघतही नाहीत. ते दुसरीकडे बघत बॉल टॅप करतात आणि गोल करण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या संघाला चकवा देतात. आम्हीही चकवा देत असतो. आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. तुमचा चकवा योग्य बसला की बॉल वर जातो, आमचा चकवा बसला की गुलाल अंगावर पडतो. फरक एवढाच आहे की, तुमचा एक चकवा चुकला तर दुसऱ्या बाजुला चकवा टाकायला तुम्हाला संधी मिळते. पण आमचा एक चकवा चुकला की पाच वर्षे घरात बसावं लागतं, असं विधान शहाजी बापू पाटलांनी केलं आहे.