वाई: राज्यातील शिवसेनेच्या विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही. जे काही झालेले आहे ते कायद्याला धरून झालेले आहे .त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष विचार करून आणि कायदेशीर बाबी तपासून निर्णय देतील असा विश्वास ‘शिंदे गट शिवसेनेचे आमदार महेश शिंदे’ यांनी व्यक्त केला. कोरेगाव येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आमदार शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> वैद्यनाथ साखर कारखाना १९ कोटी रूपये GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

शिवसेनेच्या आमदारांवर व आपल्यावर अपात्रतेची टांगती तलवार वगैरे काही नाही असे सांगून आमदार महेश शिंदे म्हणाले,  आमदार अपात्र होणार असे सातत्याने म्हणणाऱ्यांनी एकदा ग्रामपंचायत निवडणूक तर लढवावी. सदस्य अथवा सरपंच अपात्र करण्याचे प्रयत्न करावे म्हणजे कळेल की ते किती अवघड असते. पाच वर्षात कधीही सदस्य अपात्र झाला नाही. माझ्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही एकही सदस्य अपात्र करू शकलो नाही. हे तर आमदार आहेत ती किती हुशार असतील मग लक्षात घ्या. सदस्य अपात्र झाला तर तो तब्बल सहा वर्षांनी होतो. तो पर्यंत त्याची मूळ मुदत संपलेली असते. आमच्या खातगुण (ता कोरेगाव) ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य अपात्र ठरला, तर आम्ही उच्च न्यायालयातून स्थगीती घेतली. प्रत्यक्ष निकाल सहा वर्षांनी लागला असेही आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.राज्यात शिवसेनेच्या विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रेतेची सुनावणी हि एक कायदेशीर प्रक्रिया आहे.आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही. जे काही झालेले आहे ते कायद्याला धरून झालेले आहे .त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष विचार करून आणि कायदेशीर बाबी तपासून निर्णय देतील .आमच्या अपात्रातेचं राहूदे स्वतःचं बघा असा टोलाही महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना लगावला.

हेही वाचा >>> पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”

विधानसभा मतदारसंघात मागील नेतृत्वाने विकास निधीचा पत्ता नसताना जनतेची बलामन करत किंवा नारळ फोडले मात्र विकास कामे झालीच नाही आम्ही केवळ नारळ फोडत नाही तर प्रत्यक्षात विकास कामे करूनच सर्वसामान्यांचे हित पाहतो असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले कोरेगाव नगरपंचायतीच्या ३५ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले सातारा कोरेगाव हि यापुढे शॅडो सिटी बनवायची आहे असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मधून आमदार महेश शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला. यावेळी सुनील खत्री राहुल बर्गे उपनगराध्यक्ष सुनील बर्गे आदींनी मनोगत व्यक्त केले.

Story img Loader