गेल्या काही दिवसात शिंदे गटातील अनेक नेत्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही घटना ताजी असताना आता शिंदे गटाचे प्रवक्ते राजीव भोर पाटील यांनी सुषमा अंधारेंचा भलत्याच शब्दात उल्लेख करत टीका केली आहे.
सुषमा अंधारेंनी वाचाळपणाचा कळस केला आहे. निव्वळ नौटंकीबाजपणा म्हणजे सुषमा अंधारे आहेत, असा उल्लेख करत राजीव भोर पाटील यांनी टीका कली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत टीकास्र सोडलं आहे.
हेही वाचा- “राज्यपालांचं वय झालंय, आता त्यांना…” शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वसंत मोरेंची खोचक टीका!
सुषमा अंधारेंवर टीका करताना राजीव भोर पाटील म्हणाले, “सुषमा अंधारेंनी वाचाळपणाचा कळस केला आहे. सुषमा अंधारे काल मंत्री अब्दुल सत्तारांबद्दल काय बोलल्या? हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. अब्दुल सत्तार हे घरवालीचे तरी आहेत का? असा प्रश्न सुषमा अंधारेंनी सत्तारांना विचारला. मुस्लीम धर्माचं अनुकरणं कसं करावं? हे सुषमा अंधारेंनी अब्दुल सत्तारांना शिकवावं, हे वाईट आहे. खरं तर, धर्माबाबत कुणालाही शिकवण्याची सुषमा अंधारेंची लायकी नाही. ज्या बाईने स्वत:चा पत्नीधर्म, मातृधर्म नीट निभावलेला नाही, असं त्यांच्या विभक्त झालेल्या पतीने जाहीरपणे माध्यमांसमोर सांगितलं आहे. अशा बाईने इतरांना धर्म शिकवू नये.
हेही वाचा- “जो कोश्यारींचं धोतर फेडेल, त्याला…” सोलापुरात ठाकरे गटाकडून मोठी घोषणा!
“मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुषमा अंधारे हिंदु देव-देवतांबद्दल वाटेल ते बरळत आहेत. वाटेल तसं भाष्य करत आहेत. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना ‘रामराव’ म्हणणं, पार्वती मातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं. नवरात्री उत्सवांवर उपहासात्मक भाष्य करणं. त्यानंतर त्याच महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दरश्न घेणं आणि पोझ देऊन फोटो काढणं. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका नौंटंकीबाजपणा कुठल्याही बाईच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिला नाही. निव्वळ नौटंकीबाजपणा म्हणजे सुषमा अंधारे” अशा शब्दांत राजीव पाटील भोर यांनी टीका केली आहे.