दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिंदे गटाच्या वतीने ठाण्यात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर तोफ डागली. सुषमा अंधारे यांनी ही संस्कृती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी शिकवली का? असा सवालही उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे गटावर आगपाखड केली. यावरून या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी काल (१४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

“सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ठाणेकरांना ओव्हर स्मार्ट संबोधलं. दिवाळी पहाटची व्याख्या काय आहे, हे मला कळलं नाही. दिवाळी पहाट अशीच असावी असं कोणी म्हटलंय का हेही मला माहित नाही. खरंतर लोककला लोक सादर करतात त्यांचा सन्मान ठाणेकर नेहमीच करतात. ही ठाणेकरांची संस्कृती आहे. त्यामाध्यमातून आपण दिवाळीचा कार्यक्रम घेतला”, असं स्पष्टीकरण मिनाक्षी शिंदे यांनी दिलं.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा >> “दिवाळी पहाटला मंगल गाणी असतात, ठाण्यात वाजवली ती…”, सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

त्या पुढे म्हणाल्या की, गणपती, जन्माष्टमीला प्रत्येक कलाकाराला व्यासपीठावर बोलावून नाचवलं जातं. तेव्हा कोणीही आक्षेप घेत नाही. गौतमीने अंगभर कपडे घालून माझ्या व्यासपीठावर नृत्य केलं, तिच्याबाबत आक्षेप नोंदवला. पण सनी लिओनी, राखी सावंत, उर्फी जावेद किंवा भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान नावापुरते कपडे घालतात अशा लोकांचा महाराष्ट्रात सन्मान होतो आणि अंगभर कपडे घातलेल्या गौतमीला विरोध होतो. जे नेते या गोष्टीवर बरळतात त्यांची कीव येते. लोकसंस्कृतीचा जागर करणाऱ्या महिलेवर टीका होतेय. ती गरीब घरातून आली आहे आणि इतर जरा श्रीमंत घरातील आहेत त्यामुळे हा भेदभाव सुरू आहे.”

गौतमीने प्रत्येक कार्यक्रमात अंगभर कपडे घातलेत

“मुंब्र्यातून आम्ही काहींना पळवून लावलं. पण, मिनाक्षी शिंदेच्या कार्यक्रमात अलोट गर्दी पाहून आव्हाडांच्या पोटात दुखलं असेल. मी गौतमी पाटीलचे कार्यक्रम पाहिलेत. तिने प्रत्येक कार्यक्रमात अंगभर कपडे घातले होते. दिवाळी पहाटच्या दिवशी सकाळी ५.३० वाजल्यापासून सगळे उभे होते. ६५ वर्षीय आजीही तिथे उपस्थित होत्या. गौतमीच्या क्रेझमुळे आव्हाडांच्या पोटात दुखलं असेल”, असंही मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

सुषमा अंधारे हिंदुद्वेषी

“सुषमा अंधारे हिंदुद्वेषी आहेत. एकपात्री नाटकातून त्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालत असतात. अशी महिला आपल्या सणांबद्दल बोलते. बाळासाहेबांना काय वाटलं असतं असं त्या विचारतात. पण जी बाई बाळासाहेबांचा उल्लेख थेरडे म्हणून करत होती तिला उद्धव ठाकरे आपल्या बाजूला बसवून घेतात ही शोकांतिका आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या.