Anand Dighe Ashram Video: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाची एक चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून आता शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आश्रमात पैसे उडविणारे शिवसैनिक बारमध्ये जाणार होते, म्हणूनच त्यांनी त्यापद्धतीप्रमाणे पैसे उधळले, असा आरोप उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली. स्व. आनंद दिघेंनी त्याकाळी बार फोडून सामान्य माणसाला न्याय दिला होता. पण त्याच दिघे साहेबांच्या आश्रमात बारप्रमाणे पैसे उडविले जाणे, हा दिघे साहेबांचाच अवमान आहे, अशीही टीका नाईक यांनी केली.

आनंद दिघे असते तर हंटरने फोडले असते

स्व. आनंद दिघेंच्या घरात भिंतीवर एक हंटर लावलेला होता. काल आनंद आश्रमात झालेला धिंगाणा आनंद दिघेंनी पाहिला असता तर भिंतीवरील हंटर काढून त्यांनी लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढलं असतं. जे स्वतःला आनंद दिघेंचा वारसादार मानतात, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, हा आनंद दिघेंचा वारसा नाही. आनंद दिघे अशाप्रकारच्या लोकांचे कधीच समर्थन करत नसत. बारमध्ये ज्या प्रकारे पैसे उधळावेत, त्या पद्धतीने आनंद आश्रमात पैसे उधळले गेले, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण; समाजमध्यमांवर चित्रफीत प्रसारित, ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका

या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे काम हे सरकार करत आहे. पण ज्यांना गुरू मानले, त्यांनाही यांनी सोडलेले नाही. गुरूचीही अपकीर्ति यामाध्यमातून केली आहे. आनंद दिघेंना यांनी गुरू मानले असले तरी दिघेंनी यांना आपले शिष्य मानले होते का? बारमध्ये पैसे उधळावेत, अशा प्रकारचे कृत्य आनंद दिघेंच्या आसनासमोर झाले. अशाच प्रकारचा पैशांचा धिंगाणा राज्यभरात सुरू आहे. हा धिंगाणा फक्त लुटीच्या पैशांतूनच केला जाऊ शकतो, कष्टाचा पैसा असा उडवला जात नाही. पैसे उडविणाऱ्यांची चौकशी केली पाहीजे. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? याचा शोध घेतला पाहीजे.

स्वतःला आनंद दिघेंचे चेले म्हणवून घेणाऱ्यांनी यावर भाष्य केले पाहीजे. दिघे साहेब असते तर भिंतीवचा हंटर आज नक्कीच खाली उतरला असता आणि एकेएकाला फोडून काढले असते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Story img Loader