शिवसेना नक्की कोणाची यावर निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे व शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ‘धनुष्य-बाणा’चा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करुन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात बोलताना ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडताना एका परिस्थितीत आज निकाल लागला तरी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाकडेच राहू शकतं असं म्हटलं आहे.
नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा