मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या न्यायालयीन लढाईमध्ये पहिला निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. खरी शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये मोकळा करुन दिल्यानंतर शिंदे गटाने आता दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी दादारमधील शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी दिल्यानंतर आता वांद्रे-कुर्ला संकुल येथे शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. पुढील आठवड्यात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार शिंदे गटाने केला असून याच निमित्त शिंदेंच्या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाबद्दल मोठं विधान केलं आहे.
नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा