शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत. आज दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.
नेमके काय घडले?
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. यानिमित्ताने खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेरी येथे गेले होते. याच वेळी समोरून शिवाजीराव आढळराव-पाटील हेदेखील किल्ले शिवनेरी येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले. यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. तसेच शिवाजीराव आढळराव-पाटील यांनीही अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आरोग्याची विचारणा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघून गेले.
हेही वाचा : “…तर धाकदपट’शाहां’ची भीती वाटत नाही”, शरद पवार गटाची सूचक पोस्ट; व्हिडीओत केला छत्रपतींचा उल्लेख!
अमोल कोल्हे काय म्हणाले?
शिवाजीराव आढळराव-पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेरी येथे आमने-सामने आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आढळराव-पाटील यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करत “राजकारण हा पिंड नाही. मात्र, शिवसंस्कार हाच आमचा पिंड”, असे म्हटले आहे.
आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात होते. ते शिवसेनेकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढविणार होते. मात्र, महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार असल्याचे निश्चत मानले जात आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.