मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये नेतेपदी १० जणांना स्थान देण्यात आले आहे. तर डझनभर लोकांना सरचिटणीस करण्यात आले आहे. मात्र यामध्ये शिशिर शिंदे यांचे नाव कुठेच नाही. शिशिर शिंदे मनसेत अस्वस्थ असून पुन्हा शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली होती. कार्यकारिणीत शिशिर शिंदे यांना स्थान न देऊन राज ठाकरेंनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. या यादीपेक्षाही शिशिर शिंदे यांचे नाव यादीत नाही याचीच चर्चा जास्त रंगली आहे. मनसेने कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. २० मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती.

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, दीपक पायगुडे, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, प्रमोद (राजू) पाटील, अभिजित पानसे या सगळ्यांना नेतेपद देण्यात आले आहे. तर मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, प्रकाश भोईर, राजेंद्र शिरोडकर, राजीव चौगुले, यशवंत (संदीप) देशपांडे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि अशोक मुर्तडक या सगळ्यांना सरचिटणीस पद देण्यात आले आहे.