किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची पुढील पिढ्या आणि पर्यटकांना ओळख होण्यासाठी अफजल खानाच्या कबरी जवळ गडाच्या पायथ्याशी शिवप्रताप स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.अफजल खानाच्या कोथळा काढतानाचा पुतळा उभारणी तसेच लाईट व साउंड शो, सुरु करण्याचा निर्णय पर्यटन मंत्री मंगलप्रभास लोढा यांचा यांनी घेतला आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला.याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे. जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत “हिंदू एकता आंदोलन, सातारा” व इतर संघटनांकडून शासनाला याबाबत विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने पर्यटन मंत्री मंगलप्रभास लोढा यांनी पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्या आला आहे.

chhatrapati shivaji maharaj statue collapse case Sculptor Jaideep Apte in judicial custody
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटे याला न्यायालयीन कोठडी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
police issue lookout notice against sindhudurg shivaji statue artist jaydeep apte
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी
Sharad Pawar On CM Eknath Shinde
Sharad Pawar : “मुख्यमंत्र्यांचं ते विधान धक्कादायक”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
MVA Protest in Mumbai
MVA Jode Maro Andolan : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन, ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
Ajit Pawar On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Ajit Pawar : “राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो”, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया
deepak kesarkar reaction on collapse of shivaji maharaj statue
या दुर्घटनेतून काहीतरी चांगले घडावे! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी केसरकर यांची प्रतिक्रिया
case against sculptor and consultant marathi news
शिल्पकार, सल्लागारावर गुन्हे; मालवण पुतळा दुर्घटनाप्रकरणी सदोष मनुष्यवधाचाही ठपका

नुकतेच प्रतापगडावरील अफजलखान कपरी परिसर वनखात्याच्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण शासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात पाडले आहे .तेथील मलबा उचलण्याचे काम अद्यापही सुरू आहे. या वेळी या परिसरात आणखी काही कबरी आढळून आले आहेत. या कबरी अनधिकृत असून शासनाने परवानगी दिल्यास त्याही हटवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येथील प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम व अफजलखानाचे दैवतीकरण रोखल्यानंतर शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी शिवप्रताप स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव दाखल करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रसाद केवढा यांनी तसे आदेश दिले आहेत

हिंदू एकता आंदोलन च्या मागणीला यश: विक्रम पावसकर
प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारून तिथे साउंड व लेजर शो सुरू करण्यासंदर्भात हिंदू एकता आंदोलन च्यावतीने मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ प्रस्ताव मागविला व त्यासंबंधी कार्यवाही सुरू केली. त्याबद्दल शासनाचे आभार मानतो.

विक्रम पावसकर जिल्हाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन