सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त शिवसैनिकांनी पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला चोप दिलाय.. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील हा प्रकार असून संतप्त शिवसैनिकांनी व्यक्तीला जाहीर माफी मागायला लावली आहे. इच्छाराम मधुकर बाविस्कर असे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत इच्छाराम बाविस्कर यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जळगावमधील शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा म्हणजेच इच्छाराम यांचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला आहे. तसेच शिवसैनिकांनी त्याला पोस्टप्रकरणी जाहीर माफी मागायला लावली असून त्याने मागितलेल्या माफीचादेखील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, इच्छाराम बाविस्कर या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची व्हायरल झालेली पोस्ट लहान मुलाच्या हातून पोस्ट झाल्याचे झाल्याचे सांगितले असून माफी मागतिली आहे. “लहान मुलाच्या हातून आक्षेपार्ह पोस्ट ग्रुपवर टाकण्यात आली. मी कामात व्यस्त असल्यामुळे मुलाने हा फोटो कार्टून म्हणून पोस्ट केला. ही पोस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल होती. या पोस्टशी मी सहमत नाही. लोकांच्या मनात जे भाव तयार झाले असतील त्याबद्दल मी माफी मागतो. मी स्वत: शिवसैनिक आहे,” असे म्हणत बाविस्कर यांनी माफी मागितली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainik beaten man for posting objectionable post on social media against uddhav thackeray in jalgaon district prd