रत्नागिरी : सध्या शिवसेनेचे खासदार असलेल्या जागांवर आम्ही लढण्यासाठी आग्रही असून उमेदवारांची तयारीही केली आहे. त्यामुळे रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेकडे राहणे नैसर्गिक न्यायाला धरुन होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नगिरी जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.

या मतदारसंघात भाजपाला चांगला जनाधार असल्याने ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंची मागणी असल्याचे भाजपाचे या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत नमूद केले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून सामंत यांनी या जागेवर दावा केला आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्व राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीतर्फे या निवडणुका एकत्रितपणे लढवल्या जातील. पण सध्या शिवसेनेचे खासदार आहेत त्या जागा शिवसेना लढवेल, हे स्वाभाविक आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्या दृष्टीने आम्ही उमेदवारांची तयारी केली आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील. पण माझे बंधू किरण सामंत येथून रिंगणात उतरण्यास तयार असतील तर साडेतीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा विजय निष्टिद्ध पणे होईल. या मतदारसंघावर भाजपाचे माजी आमदार जठार यांनी दावा केला आहे. यावर सामंत म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही. इच्छुक कोणीही असू शकते. जठार निवडणुकीसाठी इच्छुक असतील तर त्याची माहिती आपल्याकडे नाही. परंतु संपूर्ण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले आपले बंधू किरण सामंत निवडणूक रिंगणात उतरल्यास  साडेतीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल.

रत्नगिरी विमानतळावरुन नागरी हवाई वाहतूक सुरु होण्यासाठी चालू असलेल्या कामाच्या प्रगतीबाबत सामंत यांनी सांगितले की, आता ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षितपणे उतरवणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक ‘व्हॉलिंन्टीर रॅपिड डिझास्टर मॉनेटरिंग अॅण्ड मॅपिंग’ (व्हीओआरडीएम) ही यंत्रणा रत्नगिरी विमानतळावर बसवली जाणार आहे. त्यासाठी काही दिवसातच न्यूझीलंड येथून तंत्रज्ञ येणार आहेत. विमानतळासाठी आणखी १७ एकर संपादित करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रात्रीच्या वेळीसुद्धा विमान उतरवणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर धोका पत्करण्यापेक्षा नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळावर  विमान उतरवले जाते. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते. अशा वेळी विमान येणे किंवा उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो. हे टाळण्यासाठी रत्नगिरी विमानतळावर ‘व्हॉलिंन्टीर रॅपिड डिझास्टर मॉनिटरिंग अॅण्ड मॅपिंग’ व्हीओआरडीएम ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरवता येणार आहे. ही एक अत्याधुनिक यंत्रणा आहे. ती रत्नगिरीत दाखल झाली आहे. ती बसवण्यासाठी न्यूझीलंड येथून तज्ज्ञ लवकरच रत्नगिरीत दाखल होणार आहेत.