नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदी उल्का जाधव, रझिया रखांगे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दापोलीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत सोमवारी शिवसेनेने काँग्रेसशी आघाडी करत जिल्ह्य़ात नव्या राजकीय समीकरणाला चालना दिली. या आघाडीच्या जोरावर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उल्का जाधव आणि उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रझिया रखांगे यांची बहुमताने निवड झाली. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्या दापोलीत शिवसेनाविरहित महाआघाडीच्या फॉम्र्युलाला खीळ बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे सात, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी चार आणि भाजपचे दोन नगरसेवक निवडून आल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे आमदार संजय कदम यांनी भाजपला नगराध्यक्षपदासाठी पािठबा देत शिवसेनाविरहित नव्या महाआघाडीची समीकरणे मांडण्याचा प्रयत्न केला. दापोलीत राष्ट्रवादीसाठी शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असला तरी काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपला समर्थन देण्यास काँग्रेसने उघड विरोध केला. याच मतभेदांवरून काँग्रेसने अखेर शिवसेनेला साथ देण्याचे ठरवत आघाडीधर्म तोडण्याचा निर्णय घेतला. परिणामी शिवसेनेची सात आणि काँग्रेसची चार असे एकूण ११ नगरसेवकांचे संख्याबळ जाधव यांच्या पाठिशी आले.
दरम्यान, महिलांसाठी राखीव असलेल्या या पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने नम्रता शिगवण आणि भाजपने जया साळवी यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेबरोबर जाण्याबाबत काँग्रेस ठाम राहिल्याने दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी आपापल्या उमेदवाराला मत देत मतदानाचे सोपस्कार पार पाडले. त्यामुळे श्रीमती शिगवण यांना चार, तर श्रीमती साळवी यांना दोन मते पडली.
उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रझिया रखांगे यांना अकरा मते मिळाली. श्रीमती रखांगे यांनी नगराध्यक्षपदासाठी केलेला अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेत शिवसेना-काँग्रेस आघाडीचे संकेत त्याच वेळी दिले होते. दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणाऱ्या राष्ट्रवादीच्या सचिन जाधव यांना स्वत:च्या पक्षाची चार मते मिळाली, तर भाजपने या वेळी तटस्थ भूमिका घेतली. मुळात शिवसेनेतर्फे जाधव यांच्यासह कृपा घाग आणि डॉ. शबनम मुकादम यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आले होते. शेवटच्या दिवशी कृपा घाग यांनी अर्ज मागे घेत नव्या-जुन्याच्या वादावर पडदा टाकला होता. त्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या जाधव यांचा मार्ग मोकळा झाला होता. पण डॉ. मुकादम यांनी पदासाठीचा स्वत:चा आग्रह कायम ठेवला होता. सरतेशेवटी शिवसेनेने काँग्रेसच्या पािठब्याने जाधव-रखांगे जोडीला निवडून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुकादम यांनी पक्षादेश मानत जाधव यांच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, कृपा घाग यांचा अर्ज कायम राहिला असता तर शिवसेनेत फूट पडण्याची चिन्हे होती. त्या बळावर राष्ट्रवादी आणि भाजप यांचा सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा होता. पण शिवसेनेतील बंडाचे निशाण अखेरच्या क्षणी खाली उतरल्याने त्या राजकीय समीकरणांना पूर्णविराम मिळाला. त्यातही दापोलीतील काँग्रेसचे निर्णय आतापर्यंत राष्ट्रवादी नेतृत्वाकडूनच घेतले जात होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार निवडीपासून पदनिश्चितीपर्यंत सर्वच निर्णयप्रक्रिया राष्ट्रवादीच्या दरबारात पार पाडत असे. यंदा प्रथमच काँग्रसने स्वत:ची निर्णयक्षमता दाखवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला.
या नव्या आघाडीचा प्रासंगिक करार असा उल्लेख करत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले की, ‘मालिक दिलदार है, चमचों से बेजार हैं, या वाक्प्रचाराप्रमाणे राष्ट्रवादीचे दापोलीत कामकाज सुरू असून त्यामुळेच काँग्रेसला आघाडीतून बाहेर पडावे लागले.’