शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज रायगडच्या महाडमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी रत्नागिरीतल्या बारसू येथे जाऊन रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटावर टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आता महाडमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची मोठी सभा आयोजित केली आहे. तत्पूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा शिवसेना प्रवेश पार पडला. यावेळी आमदार सुभाष देसाई, खासदा संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार अनंत गीते उपस्थित होते.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

काँग्रेसने आम्हाला नेहमीच मान सन्मान दिला आहे, याबाबत आपली कोणतीही तक्रार वा नाराजी नाही. जो संघर्ष माणिक जगताप (स्नेहल जगताप यांचे वडील) यांनी केला तसाच संघर्ष उद्धव ठाकरे करीत आहेत, तीच प्रेरणा घेत प्रवाहाविरोधात जात आपण उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशापूर्वी माजी खासदार अनंत गीते यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली. अनंत गीते म्हणाले, भुताला बाटलीत भरायला आम्ही समर्थ आहोत. खरं म्हणजे त्या भुतामध्ये हिंमत नाही. त्याच्यात मर्दुमखी असेल तर त्याने राजीनामा द्यावा. आत्ताच त्याला आम्ही बाटलीत बंद करून टाकू.

हे ही वाचा >> “अजित पवार शांत बसणार नाहीत, येत्या काही दिवसात…”, अंजली दमानियांचा मोठा दावा

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे. त्यामुळे गीते यांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असावा असं बोललं जात आहे.

Story img Loader