भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर आज दगडफेक व शाई फेकल्या गेल्याची घटना घडली, तर शिवसेना कार्यकर्त्यांनीच हे केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांन केला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे. तसेच, त्यांनी आपल्या ट्विटसोबत किरीट सोमय्या यांचं देखील ट्विट जोडलं आहे, ज्यांमध्ये गाडीवर शाई फेकली गेलेली दिसत आहे.

तसेच, “जनतेची फसवणूक करून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या उद्देशाने, महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सतत आवाज उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ आणि संघर्षशाली नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलेलं आहे.

शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याचा सोमय्यांचा आरोप; शेअर केले गाडीचे फोटो

हा सर्व घटनाक्रम साडेबाराच्या सुमारास घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे कालच सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच भेटीदरम्यान हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे.