अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. शिंदे गट-भाजपाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल पत्रकारपरिषदेत बोलताना ही निवडणूक बिनविरोध करावी असं म्हटलं. तर राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
Andheri by-election : इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…; अरविंद सावंतांचं विधान!
“भाजपा माणुसकीहीन, संवेदनाहीन, संस्कृतीहीन पक्ष आहे.” असंही म्हणाले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-10-2022 at 09:19 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeभारतीय जनता पार्टीBJPमनसेMNSराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Sena
+ 2 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader arvind sawants reaction on raj thackerays letter to bjp regarding andheri by election msr