Gulabrao Patil On Assembly Election 2024 : विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या राजकीय नेते आपल्या मतदारसंघाचा दौरा करत कामाचा आढावा घेत आहेत. तसेच विविध ठिकाणी मेळावे, सभा, आणि आढावा बैठका घेत कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना देत आगामी निवडणुकीबाबत रणनीती आखत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबतं सुरु आहेत. अशातच निवडणुकीच्या आधी राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. “दाढीवाले बाबा वरती बसलेत, तुम्ही या दाढीवाल्या बाबाकडे लक्ष द्या”, असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केलं.

ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

हेही वाचा : Manoj Jarange : “मी शेवटच्या घटकेपर्यंत…”, मनोज जरांगेंना अश्रू अनावर; मराठा समाजाला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“मी तुमच्यावर बारीक लक्ष ठेवतो. माझ्या निवडणुकीमध्येही तुम्हाला बारीक लक्ष ठेवावं लागेल. हे आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आपली कामं सुरुच राहणार आहेत. मी सांगितल्या प्रमाणे पाच वर्षात १ हजार ८२५ दिवसही मी तुम्हाला देतो. त्यामुळे मला खात्री आहे की मी म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणजे मी आहे. आपलं शरीर वेगवेगळं असलं तरी आपला आत्मा एकच आहे, असं मानणारा मी कार्यकर्ता आहे”, असं गुलाबराव पाटील कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.

“मला खात्री आहे की, निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळे प्रचार होतील. आताही आपल्याबाबत वेगळे प्रचार होत आहेत. भारतीय जनता पक्ष वेगळी निवडणूक लढवणार, मग आपल्या त्रास होणार, असे प्रचार होत आहेत. मात्र, असं काहीही होणार नाही. वरती पॅचअप पक्क आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी युती पक्की आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही. आपले दाढीवाले बाबा वरती बसलेत, त्यामुळे तुम्ही या दाढीवाल्या बाबाकडे लक्ष द्या, वरती आपले दाढीवाले बाबा आपलं सगळं काम बरोबर करतात”, असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं.