Sanjay shirsat on Girish Mahajan: भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी ३० वर्षांपासून शिंदे यांच्याबरोबर काम करत आहे. माझे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. आम्ही जुन्या गोष्टींना उजाळा दिला. मात्र या शिंदेंची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे या भेटीमागे राजकारण असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. तसेच गिरीश महाजन हे संकटमोचक वैगरे नसल्याचे ते म्हणाले.

संजय शिरसाट माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “त्या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याची मला कल्पना नाही. पण गृहखात्यावर किंवा इतर कोणत्याही खात्यावर गिरीश महाजन यांची चर्चा झालेली नाही. तसेच गिरीश महाजन यांना ते अधिकार सुद्ध नाहीत. जर खात्यांबाबत चर्चा झालीच तर ती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात होईल. गिरीश महाजन हे फक्त प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. तसेच प्रकृती बरी झाल्यानंतर तातडीने बैठक घेतल्या तर जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी त्यांची विनंती होती. म्हणून संकटमोचक गेले आणि काही तिढा सुटला, असा काही प्रकार इथे झालेला नाही.”

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?

हे वाचा >> रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया; प्रकृतीविषयी दिली अपडेट, म्हणाले…

एकनाथ शिंदे ५ डिसेंबरच्या शपथविधीला हजर राहणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी ज्युपिटर रुग्णालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी गेले होते. यानिमित्ताने संजय शिरसाट माध्यमांशी बोलत असताना त्यांना एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. जर शिंदेंची प्रकृती ठीक नसेल तर ते ५ डिसेंबरच्या शपथविधीला हजर राहणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शिरसाट म्हणाले की, शपथविधीला ते हजर राहणार की नाही? याबाबत डॉक्टरच ठरवू शकतात. त्यांची मनस्थिती कशी आहे, याबाबत डॉक्टरच सांगू शकतील. पण आमची सर्वांची इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनी शपथविधीला हजर राहावे.

दरम्यान, ज्युपिटर रुग्णालयात चाचण्या पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईतील वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. इथे ते शिवसेना आमदारांची बैठक घेणार आहेत.

Story img Loader