Shiv sena leader Sanjay Shirsat on Sharad Pawar future of Mahavikas Aghadi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला विजय मिळाला. तर महाविकास आघाडीली दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. तर दुसरीकडे विरोधकांची महाविकास आघाडी मात्र कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. याबद्दल शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी तर विरोधकांची आघाडी शिल्लक राहिली नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांच्याबद्दलही मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल (१७ डिसेंबर) उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. जरी ही सदिच्छा भेट असल्याचं शिवसेनेकडून (ठाकरे) स्पष्ट करण्यात आलं असलं तरी यावरून महाविकास आघाडीत अंतर्गत हालचाली सुरू असल्याच चर्चा होत आहे.

महाविकास आघाडी राहिलीय कुठे – शिरसाट

विधिमंडळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची भेट घेतली नाही, पण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकरांना भेटले, याबद्दल शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. “हा त्याचा आपापसातील मामला आहे. आघाडी राहिली कुठे?”, असं संजय शिरसाट म्हणाले. तर महाविकास आघाडीच्या भविष्याबद्दल बोलताना शिरसाट पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाही, महाविकास आघाडीने एकमेकांना पाडण्याचे जे काम केले आहे, त्याचा परिणाम या निवडणुकीतून दिसून आला आहे. म्हणून नाना पटोले, उद्धव ठाकरे हे कोणी कोणाशी भेटणार नाहीत. त्यांच्या माना वेगळीकडे झाल्या आहेत. शरद पवार हे काय निर्णय घेतील हे अधिवेशनानंतर किंवा त्याआधीच कळून येईल.

हेही वाचा>> Neelam Gorhe संसदेत अमित शाह यांचं बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य, विधान परिषदेत पडसाद उमटताच नीलम गोऱ्हे विरोधकांवर संतापल्या, “चुकीच्या…”

शरद पवार वेगळा निर्णय घेणार?

शरद पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात का? “शरद पवार आहेत ते, तुम्हाला कुठे दिसतायत का? सुप्रिया सुळे कुठे बोलताना दिसत आहेत का? त्यांचे कोणी प्रवक्ते कुठे बोलताना दिसतात का? याचा अर्थ समजून घ्या, जेव्हा ते सर्वजण शांत असतात तेव्हा समजून जायचं की वादळ निर्माण होणार आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader sanjay shirsat on sharad pawar future of mahavikas aghadi uddhav thackeray meets devendra fadnavis rak