कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, असं सर्वसाधारणपणे मानलं जात असल तरी तपशिलात गेलं तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकण विभागातील तीन जिल्ह्य़ांपैकी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माजी मुख्यमंत्री नारायण राणेप्रणित काँग्रेसने सेनेला शह दिला आहे. त्यामुळे आजमितीला फक्त रत्नागिरी जिल्ह्य़ातच सेनेचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेप्रमाणेच या जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका सेनेच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई बनल्या आहेत. नगर परिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्य़ातील चारपैकी राजापुरात तुल्यबळ, रत्नागिरीत स्पष्ट बहुमत आणि चिपळूण व खेड नगर परिषदेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष अशी कामगिरी बजावत सेनेने शहरी भागातील पकड मजबूत केली असून आता जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण भागात कस लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मावळत्या सभागृहातील ५७ सदस्यांपैकी सेना ३१, राष्ट्रवादी काँग्रेस १६, भाजप ८ आणि काँग्रेस व बविआ प्रत्येकी १ असे बलाबल होते. त्या निवडणुकीत भाजपच्या मर्यादित यशामध्येसुद्धा सेनेचा वाटा होता. लोकसंख्येच्या निकषावर झालेल्या मतदारसंघ फेररचनेनंतर जिल्ह्य़ातील गटांची संख्या दोनने कमी होऊन ५५, तर गण १११ झाले आहेत. येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्यामुळे आपापले उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांची सध्या धांदल उडाली आहे. त्यात अपेक्षेनुसार सेना व राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. शिवसेना हा जिल्ह्य़ातील सर्वात बलवान पक्ष असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आणि उमेदवारी न मिळणाऱ्या नाराजींची बंडखोरीही जास्त. त्यामुळे सेनेचे स्थानिक नेते टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर करत आहेत. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा परिषदेच्या ३२, तर पंचायत समित्यांच्या ७२ उमेदवारांची नावे गेल्या शनिवारी घोषित केली. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या यादीत दोन विद्यमान सभापतींसह सहा जण वगळता बाकी सर्व नवीन चेहरे आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि सेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील चिघळलेल्या राजकीय संघर्षांमुळे दापोली व मंडणगड या दोन तालुक्यांमधील सर्व जागा आणि आणि स्थानिक पातळीवर इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नावं घोषित झालेल्या सात तालुक्यांमधीलही काही जागा मिळून अजून ३३ नावं निश्चित व्हायची आहेत. जाहीर झालेल्या यादीतही खाडाखोड करून काही नावं शेवटच्या क्षणी घुसडली गेल्याचा काही इच्छुकांचा आरोप आहे. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी अटळ दिसत आहे, तर काही प्रबळ दावेदार भाजपच्या तंबूत दाखल होण्याच्या तयारीत आहेत. कारण सर्व जागा लढवण्यासाठी स्वत:च्या पक्षाचे सक्षम कार्यकर्ते भाजपकडे नसल्यामुळे त्यांनी ‘इनकमिंग’ची दारं सताड उघडली आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी सेनेच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी त्रास होऊ शकतो. पण भाजपचं मात्र संख्याबळ घटण्याचीच शक्यता आहे.
जिल्ह्य़ात सेनेचे तीन आमदार असले तरी भाजपची पाटी कोरीच आहे. त्याचाही परिणाम या पक्षाच्या कामगिरीवर होणे स्वाभाविक आहे.
राष्ट्रवादीत कुटुंबीयांचेच कल्याण
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अजून आघाडीबाबतची खलबतं चालू आहेत. जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षामध्ये इतकी निर्नायकी अवस्था आहे की, पक्षाचे अधिकृत जिल्हाध्यक्ष नाहीत आणि काही ठिकाणी तालुकाध्यक्षपदावरूनही वाद आहेत. अशा परिस्थितीत, आघाडीबाबत चर्चा कोणाशी करायची, हाच प्रश्न असल्याचा टोमणा राष्ट्रवादीचे माजी मंत्री व जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांनी मारला. दरम्यान, राष्ट्रवादीने मात्र चिपळूण नगर परिषद निवडणूक काळातील गटातटाच्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या दूषित वातावरणावर मात करत पक्षसंघटन चांगल्या प्रकारे बांधायला सुरुवात केली असून पक्षाच्या ३२ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. हे करताना काँग्रेसशी आघाडी गृहीत धरून ११ जागा सोडण्यात आल्या आहेत. आघाडीसाठी ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहणार असल्याचंही जाधव यांनी जाहीर केलं आहे. पण पक्षाच्या उमेदवारांमध्ये पाच जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देतानाच जिल्ह्य़ाच्या विविध भागांतील विद्यमान नेत्यांनी आपापल्या सग्या-सोयऱ्यांचीवर्णी लावून घेतली आहे. जिल्हा प्रभारी जाधव यांचे चिरंजीव विक्रांत यांना तर जिल्हा परिषदेच्या दोन जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या पत्नी पूजा, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव यांचे चिरंजीव सुबोध, माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा इत्यादींना गट किंवा गणाची उमेदवारी मिळाली आहे. या व्यतिरिक्त तालुका पातळीवरील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात या पक्षाची वाटचाल ‘फॅमिली पार्टी’च्या दिशेने सुरू झाली आहे. जिल्ह्य़ाच्या उत्तर भागातील पाच तालुक्यांमध्ये भास्कर जाधव व संजय कदम हे दोन आमदार आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यामुळे राष्ट्रवादीचा जास्त प्रभाव आहे. तसंच सेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी इत्यादी नेत्यांमध्ये असलेली दुही राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे.
निवडणुकीला अजून तीन आठवडे असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत भाजप आणि काँग्रेसचेही उमेदवार जाहीर होतील, अशी चिन्हे आहेत. पण निवडणूक निकालावर प्रभाव पाडण्याइतकी त्यांची ताकद नाही. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे याहीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होईल आणि त्यात सेनेचा वरचष्मा राहील, अशी चिन्हं आहेत. पण मागील निवडणुकीप्रमाणे सेनला स्पष्ट बहुमत मिळतं का, हा औत्सुक्याचा विषय आहे.
- येत्या दोन दिवसांत भाजप आणि काँग्रेसचेही उमेदवार जाहीर होतील, अशी चिन्हे आहेत.
- निकालावर प्रभाव पाडण्याइतकी त्यांची ताकद नाही. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे याहीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होईल
- पण मागील निवडणुकीप्रमाणे सेनला स्पष्ट बहुमत मिळतं का, हा औत्सुक्याचा विषय आहे. निवडणुकीला अजून तीन आठवडे असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.