|| संतोष मासोळे

धुळे महापालिकेतील चित्र

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

धुळे : महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून शिवसेनेसह एमआयएमने भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेना-भाजप या मित्रपक्षांमधील वितुष्ट त्याच वळणावर पोहोचले आहे. भाजप विरोधात आता सेना आणि एमआयएमने एकच मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.  महानगरपालिकेत विकासकामांमध्ये घोटाळे, कचरा ठेक्यातील अनागोंदी झाल्याची तक्रार शिवसेनेसह एमआयएम करीत आहे. त्यातच लसीकरण घोटाळा उघडकीस आला.

 जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानसमोरील एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेळा निविदा काढून परस्पर लाखो रुपयांचे देयक काढण्याचा प्रकारही शिवसेनेच्या तक्रारीनंतर रोखण्यात आला. या प्रकरणाची चौकशी होऊन एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली. दुसरीकडे एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी सत्ताधारी भाजपने ठराव केल्यामुळे विकास कामे थांबल्याचा आरोप केला. भाजपला नागरिकांच्या कामांशी काही देणे घेणं नाही, त्यांना फक्त टक्केवारीतच रस आहे. महापालिकेतील नगरसेवक ठेकेदार झाल्याची टीका त्यांनी केली. शिवसेना, एमआयएमच्या कामांमध्ये खोडा घालण्याचे, अडवणूक करण्याचे काम सत्ताधारी भाजप मनपा प्रशासनाच्या माध्यमातून करीत असल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे सध्या महानगर पालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना आणि एमआयएम असा सामना रंगतांना दिसत आहे.

 धुळे महापालिकेत ५० नगरसेवक स्वबळावर निवडून आणत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. एमआयएमचे आ. फारुक शाह आणि सेना नेते शासन दरबारी पाठपुरावा करून निधी आणतात. पण, भाजप त्याचा योग्य विनियोग न करता त्यातही अर्थपूर्ण वाटाघाटी करुन मलिदा लाटत असल्याच्या एमआयएम, शिवसेनेच्या तक्रारी आहेत. सेनेने मध्यंतरी सलग नऊ दिवस घटस्थापना आंदोलन करीत प्रशासनाला रस्त्यांची कामे सुरू करण्यास भाग पाडले. भूमिगत गटार योजनेचे काम अर्धवट आहे. तरीदेखील ठेकेदारावर मेहेरनजर दाखविली गेली. आता काम बंद करून तो गायब झाल्याचे सेनेचे म्हणणे आहे. लसीकरण न करताही प्रमाणपत्र वाटपाचा घोटाळा उघडकीस आला. त्यात आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्यासह कथित दलालांना तुरुंगवारी घडली. तर आणखी दोन मुख्य संशयित नगरसेवक वसीम बारी, पठाण फरार आहेत. अमृत योजना आणि अक्कलपाडा धरण ते हनुमान टेकडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामाबाबत तशाच तक्रारी केल्या जात आहे. एमआयएमने रस्त्यांच्या कामासह कचरा संकलनाच्या ठेक्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या होत्या.

महापालिकेत भाजपचा एकही ठेकेदार नाही. आमदार शाह यांचा गैरसमज झाला आहे. घरकुले बांधण्यासाठी शाह यांनी मागितलेली जागा ही व्यापारी संकुले बांधण्याच्या उपयोगी पडणारी कोटय़वधींचे मूल्य असलेली जागा आहे. गोरगरिबांना घरे मिळालीच पाहिजेत. आम्ही त्या विरोधात नाही. परंतु, आमदारांनी दुसरी जागा सुचवावी. तसा आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा. त्यांना ती जागा दिली जाईल. शिवसेनेच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. आम्ही विकास कामांमधून त्यांना उत्तर देत आहोत.

– प्रदीप कर्पे ,महापौर, धुळे</strong>

Story img Loader