उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याचे बोलले जाते. भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले असून १० मार्च रोजी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना चिपळून येथे बोलावले आहे. माझ्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, असे भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. यावरून भास्कर जाधव हे उबाठा गटात नाराज असल्याचे म्हटले जात आहे. योगायोगाने आज दापोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होत आहे. त्याची देत असताना दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. भास्कर जाधव हेदेखील गुवाहटीला येण्यासाठी बॅग भरून तयार झाले होते, असे योगेश कदम म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यातला आनंद मला नको’, राज ठाकरेंची भाजपावर अप्रत्यक्ष टीका

माध्यमांशी बोलताना योगेश कदम म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते. ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती आहे. तेव्हा एकनाथ शिंदेंनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारले होते की, भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, काय करायचे? तेव्हा आम्ही त्यांना विरोध केला होता. भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको, ही भूमिका आम्ही मांडली होती.

भास्कर जाधव स्वतःचं कसं खरं आहे, हे रेटून न्यायचा प्रयत्न करतात. पक्षांतर्गत वाद निर्माण करण्याव्यतिरिक्त त्यांना काही येत नाही. शिवसेना-भाजपा अशी पुन्हा आघाडी होत असतानाच त्यांना आम्ही घेण्यास विरोध केला होता. त्यामुळे आता त्यांना घेण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच भास्कर जाधव यांना दुसरा कोणता पक्ष स्वीकारेल, असे मला वाटत नाही.

‘तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ केलं’, रोहित पवारांची काका अजित पवारांच्या साम्राज्यावर टीका

रामदास कदम यांनी भाजपावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. भाजपा केसाने गळा कापते, असा आरोपच कदम यांनी केला होता. या आरोपानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक्सवर पोस्ट टाकून रामदास कदम यांना इशारा दिला होता. याबाबत योगेश कदम यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, या दोन मोठ्या नेत्यांमधील गोष्टी आहेत. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता यामध्ये पडू इच्छित नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla yogesh kadam slams bhaskar jadhav says he was to join shinde faction at guwahati kvg