शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा आणि राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. अकोला येथे आयोजित रुमणे मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद सावंत म्हणाले, “शेतकर्‍यांना विम्याचे हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, नाहीतर हे रुमणे कुठे घुसेल तुम्हांला कळणार नाही. आज प्रश्नच प्रश्न आहेत. उत्तर कोण देणार? उत्तर जर त्यांनी दिलं नाही तर शिवसेना घेणार त्यांच्याकडून. आज हा मोर्चा काढुन आम्हीं स्वस्थ बसणार नाही. शेतकर्‍यांना न्याय मिळवुन देणार.”

नक्की वाचा – “विरोधकांचं ऐक्य वैगेरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही त्याग करत आलो, पण यापुढे…” संजय राऊतांचा सूचक इशारा!

याशिवाय, “शिवसेनेचा शेतकऱ्यांसाठी एल्गार ‘रूमणे मोर्चा’ अकोला. आम्हीं म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. भाजपचे नेते म्हणतात, दिल्लीपूढेही गुडघे टेकितो महाराष्ट्र माझा.” अशी टीकाही अरविंद सावंत यांनी भाजपावर केली आहे.

याचबरोबर “अकोल्यातील जनतेने आता हातात घेतले आहे रुमणे, देवेंद्रजी लक्षात ठेवा आता सत्तेत तुम्ही नाही राहणे. असा सपाटा घालू या रुमण्याचा की पळता भूई थोडी होईल तुम्हाला.” असं म्हणत अरविंद सावंतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तसेच, “पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्या ओठात एक नाही पोटात एक नाही. दिला शब्द आम्ही पाळलेला आहे.” असंही यावेली अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp arvind sawant criticized shinde fadnavis government and bjp msr