कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. जतमधील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याच ठराव केला आहे. त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवाय विरोधकांकडून भाजपावर टीकाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपावर निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारकडून काहीसी दिरंगाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होताच सीमाप्रश्नाकडे लक्ष दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर हेच बोम्मई म्हणाले होते की छोटीमोठी घटना आहे. तेव्हा सुद्धा भाजपाच्या आमदार खासदारांची तोंडं बंद होती. यांना महाराष्ट्राबद्दल कधीच अस्मिता नव्हती.” अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

हेही वाचा – Maharashtra-Karnataka issue: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य शासनाकडून चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंवर विशेष जबाबदारी

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, “लोकसभेत आठ वर्षांपासून मी हा प्रश्न शिवसेनेचा खासदार म्हणून मांडत असताना, भाजपाचे लोकसभेतील खासदार पळून जातात. मी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली की कर्नाटकातील भाजपाचे खासदार उभा राहतात आणि मग शिवसेनेचे खासदारही उभा राहतात, पण भाजपाचे महाराष्ट्रातील खासदार कुठे असतात? त्यामुळे हे सगळं वरवर दाखवण्याचं त्यांच ढोंग आहे. दरवर्षी केवळ औपचारिकता म्हणून अर्थसंकल्पाच्या भाषणात शेवटी सीमाप्रश्न मांडला जातो. मूळ प्रश्नांना बगल देण्यात भाजपा तरबेज आहेत, म्हणून त्यांनी जतचा विषय काढला. बेळगाव कर्नाटकात राहीलं काय आणि महाराष्ट्रात राहीलं काय अशी भूमिका मांडणारी भाजपा आहे.”

हेही वाचा – “बाळासाहेबांच्या नावाशिवाय ज्यांना स्वकर्तृत्वावर काहीच करता येत नाही, त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारणं …”

याशिवाय “अगोदर मी हा विषय काढला होता की २३ तारखेला सुनावणी आहे महाराष्ट्र सरकार झोपलंय का?, त्यानंतर आमचं सरकार काल-परवा जागं झालं आणि त्यांनी बैठक घेतली. दोन मंत्र्यांना नेमलं. मला उद्धव ठाकरेंचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी सीमा प्रश्नाकडे जातीने लक्ष घालेन असं सांगितलं होतं.” असंही सावंत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp arvind sawant criticized the bjp after karnataka chief minister bommais statement msr