भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात सामना होणार आहे. भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे. “प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाचे उमेदवार जरी असले तरीही ती जागा महाविकास आघाडी जिंकेल”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“माझ्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या अनेक नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणीही उमेदवारी घेण्यास तयार नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. आता या मतदारसंघात नक्कीच चांगली लढत होईल”, असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला.

Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

हेही वाचा : ‘उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याप्रती लोकांमध्ये सहानुभूती’, छगन भुजबळ याचं आश्चर्यजनक विधान

“महायुती अद्याप मुंबईमधील दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करू शकले नाही. तसेच ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्येही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही. नाशिकमध्येही अद्याप उमेदवार दिला नाही. खरं तर तो शिंदे गट नाही तर शिवसेना फडणवीस गट आहे. मोदी-शाह प्रायव्हेट लिमिटेड आहे. काही ठिकाणी त्यांना फक्त औपचारीकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसे काल उत्तर मध्य मुंबईत वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात या क्षणाला महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल”, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राऊत पुढे म्हणाले, “कोणी कितीही मोठ्या घोषणा करूद्या. विजयाची येवढी खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली. युतीचे काम करा अन्यथा तुरुंगात टाकू, मग तुम्हाला विजयाची एवढी खात्री आहे, मग धमक्या कशाला देत आहात”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“बारामती आणि शिरुर मतदारसंघात अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी, उद्योजक हे सर्व काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटीसा देणे, दंड आकारण्याच्या धमक्या देणं, मी बघून घेईल? या धमक्या कशाला देता, तुम्ही काय बघून घेता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल”, असा इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला.