केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संजय राऊतांसह खासदार विनायक राऊतांवर टीका केली. यानंतर शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत लाव रे तो व्हिडिओ स्टाईलमध्ये एक एक व्हिडिओ दाखवून नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत झालेल्या हत्यांची ज्या राजकीय हत्या होत्या त्यांची फेर चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे आपण करणार असल्याचेही विनायक राऊत म्हणाले. याशिवाय, किरीट सोमय्या यांनी या पूर्वी नारायण राणेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा देखील व्हिडिओ दाखून, या आरोपांचा देखील आम्ही ईडीकडे पाठपुरावा करणार आहोत, असेही विनायक राऊत म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील उपस्थिती होती.

नारायण राणेंना आता कदाचित त्यांचा भूतकाळ आठवत नसेल, पण… –

यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, “आज पत्रकारपरिषदेत देखील नाराणय राणेंनी अत्यंत पुचाटपणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून फार काही त्याची दखल घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटत नाही, असं सांगतोय. परंतु दुसऱ्यावर खूनाचे आरोप करत असताना, खून पचवणं, खूनाचे आरोप उघड न करणं, असे जे नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत आरोप केले. त्यावेळी नारायण राणेंना कदाचित त्यांच्या वाढत्या वयामुळे आता कदाचित विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत असेल. त्यामुळे कदाचित त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नसेल. तर मला तो त्यांना आठवण करून द्यावा लागेल. की इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गमध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकीर्दीत खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी अशा पद्धतीचे जवळपास ९ वर्ष प्रकार होत होते आणि मग रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर या सगळ्यांचे निघृण पणे केलेले खून, हे कोणी केले? आणि कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खूनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी, म्हणून कोण होतं? हे आम्हाला देखील जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये.”

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”
Donald Trump Imran Khan Fact Check video
“इम्रान खान माझे मित्र, लवकरच त्यांना तुरुंगातून बाहेर काढेन”; डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन? VIDEO खरा की खोटा
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

देवेंद्र फडणवीसांकडून विधान परिषदेत कुंडली वाचन –

“परंतु त्या ठिकाणच्या केवळ सिंधुदुर्गमधील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की या सगळ्या खूनांच्या मागचा खरा सूत्रधार कोण होता. हे केवळ मी आता बोलतोय असं नाही, तर नारायण राणेंची कुंडली ज्या पद्धतीने विधान परिषदेत या महाराष्ट्राचे माजी अत्यंत विद्वान आणि अभ्यासू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ज्यावेळी राणेंच्या कुंडलीचं वाचन केलं. ते वाचन मी तुम्हाला ऐकवतो.” असं म्हणून विनायक राऊतांनी फडणवीसांचा विधानपरिषदेतील तो व्हिडिओ सर्वांना दाखला. ज्यामध्ये फडणवीस हे भाजपावर केलेल्या टीकेवरून नारायण राणेंवर निशाणा साधताना दिसत होते.

नारायण राणे सारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही –

त्यानंतर विनायक राऊत म्हणाले की, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जे कुंडलीचं वाचन केलं. त्यामध्ये ज्या ज्या गुन्ह्यांचा अंतर्भाव केला होता आणि काही करायाचा राहिलेला आहे. आम्ही आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उद्या भेटून सिंधुदुर्गात आजपर्यंत ज्या हत्या झाल्या, ज्या राजकीय हत्या झाल्या त्याची फेर चौकशी करा आणि खरे गुन्हेगार, त्यामागचे नियोजनकर्ते कोण होते? त्यांचा शोध घ्या आणि त्या खूनाला वाचा फोडा अशाप्रकारची मागणी आम्ही करणार आहोत. नारायण राणे सारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही. आज मी नाही बोलत आहे. पण मागील वेळेस नारायण राणे यांनी किरीट सोमय्या यांचा जो उल्लेख केलेला आहे की भ्रष्टाचार उघड करणारे नेते म्हणून त्याच किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंच्या किती कोटींचा, कोणकोणत्या रिअल इस्टेटमध्ये कसा संबंध आहे?, मनी लाँडरिंगमध्ये त्यांचा कसा संबध आहे? याबाबत अगदी चांगल्या मार्मिक भाषेत टीका-टिप्पणी केलेली आहे. त्यांनी दाखवून दिलेलं आहे सर्वांना. ३०० कोटींचा गैरव्यवहार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी अविघ्न पार्कमध्ये केला होता.” असं सांगत विनायक राऊत यांनी पुन्हा एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये किरीट सोमय्या नारायण राणेंवर आरोप करताना दिसत होते आणि त्या गैरव्यवहाराबद्दल वृत्तवाहिन्यांवर बातम्या देखील आल्या होत्या. हे दिसून आलं.

“केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करताना, स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा हे राणेंकडून शिकावं” ; विनायक राऊतांनी साधला निशाणा!

Narayan Rane PC : मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केलं, ईडीला सगळी माहिती दिली आहे – नारायण राणे

यानंतर विनायक राऊत यांनी आणखी एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठा गंभीर आरोप नारायण राणे यांच्यावर केलेला दिसून आला. यावर विनायक राऊत म्हणाले, “आता ही सर्व आमच्यावर जबाबदारी आहे की, किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून नारायण राणे सारख्या एका भ्रष्टाचारी व्यक्तीवर जे गंभीर आरोप करण्यात आले होते ईडी मध्ये, त्या आरोपांचं नेमकं काय झालं? कुठे चौकशी झाली? त्या चौकशीचा नेमका टप्पा कोणता? चौकशी झाली नसेल तर ती दाबून का ठेवली? हे संपूर्ण प्रकरण आम्ही आता ईडीच्या समोर मांडणार आहोत. त्याचबरोबर संसदेच्या आगामी अधिवेशनात देखील, किरीट सोमय्या यांच्या आरोपाची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन, त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.” असंही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं.

…पण कोणाच्या नथीतून बाण मारण्याचं काम आम्ही करणार नाही –

याचबरोबर, “नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत माझा उल्लेख तीनपाट खासदार असा केलेला आहे. मला काय त्याचं दु:ख झालेलं नाही, कारण आमचा पिंडच कार्यकर्त्याचा आहे. पण कोणाच्या नथीतून बाण मारण्याचं काम आम्ही करणार नाही. त्यांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे, त्या व्यक्तीला आम्ही कधी पाहीलं देखील नाही. परंतु कोणताही आरोप करत असताना भान न ठेवता, केवळ बकवासगिरी करायची हा धंदा आता नारायण राणे यांनी सुरू केलेला आहे. मातोश्रीवर टीका करण्याचा सुरू केलेला धंदा त्यांनी आता बंद करावा.” असा सल्ला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिला.