पालघर आणि वसई विरार शहरातील अनेक शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. शुक्रवार रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी शिंदे गटास पाठिंबा दिला आहे.

यामध्ये पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य सारिका निकम, प्रकाश निकम यांचा समावेश आहे. याशिवाय वसईतील शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, शिवसेना नेते सुदेश चौधरी, माजी नगरसेवक दिवाकर सिंग आदींचा समावेश आहे.

“मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदार राजेंद्र गावित यांची प्रतिक्रिया

विशेष म्हणजे यावेळी शिवसेना खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते. मात्र, त्यांनी “मी माझ्या मतदारसंघातील कामे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. मी सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे.” असे खासदार गावित यांनी सांगितले.