शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाताना शिवनेरी गडावरील मातीचा कलशही सोबत नेणार आहेत. तर वारकरी समुदायातील एका गटानेही उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी चलो अयोध्याचा नारा दिला असून २४ आणि २५ नोव्हेंबरला ते अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याला ते शिवनेरी गडावरील मातीही अयोध्येत नेणार आहेत. उद्धव ठाकरे शिवनेरीवरील मातीचा कलश अयोध्येला नेणार आहेत. यासाठी शिवसेना नेते गुरुवारी शिवनेरी गडावर जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आदी नेते अयोध्येत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना (शिवसेना- विश्व हिंदू परिषद) स्वत:चा प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहे, असा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला.