मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५० आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. तर काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी (१६ जुलै) शिवसेनेने आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण शहराच्या प्रमुखपदावरुन हकालपट्टी केली त्यानंतर आता शिवसेनेने यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांच्या समर्थकांवरही कारवाई केली. येथे विद्यमान यवतमाळ शहरप्रमुख, यवतमाळ जिल्हा सहसंपर्कप्रमुख तसेच आर्णी तालुकाप्रमुखांची उचलबांगडी करुन नव्या नियक्त्या करण्यात आल्या आहेत. तसे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवलं, त्यांचे खरोखर आभार,” आमदार अमोल मिटकरींचा टोला

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बंडखोर आमदारांवर कारवाई करु नये, अशी विनंती केली होती. तर आमदार संजय राठोड यांनी उगडपणे शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर आमदारांमध्येही ते सहभागी होते. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेता शिवसेनेने यवतमाळ जिल्ह्यात अनेक पदांवर नव्या नियुक्त्या केल्या आहेत. भावना गवळी तसेच संजय राठोड यांना समर्थन देणाऱ्या यवतमाळ शहरप्रमुख, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख, तसेच आर्णी तालुकाप्रमुखांना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. येथे नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने तसे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणून बुजून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

दरम्यान, याआधी शिवसेनेने शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण शहरप्रमुख या पदावरुन हकालपट्टी केली. भोईर यांना हटवल्यानंतर कल्याणच्या शहरप्रमुखपदाची जबाबदारी सचिन बासरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ या दैनिकातून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. याआधी शिवसेनेने शिंदे गटातील संतोष बांगर आणि सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्यावरही कारवाई केली होती. बांगर यांना हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन तर तानाजी सावंत यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं होतं.