वाई : सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे आव्हान आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळे वाटप व शौचालयाच्या घोटाळ्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यावर महेश शिंदे यांनी केला .

हेही वाचा…मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे; भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा आरोप

लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने पवारांना यशवंत विचाराचा विसर पडल्याचे दिसत आहे. सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर चार हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले.

उच्च न्यायालयाकडून तात्पुरता जामीन असलेल्या शशिकांत शिंदे यांना फरारी आरोपी म्हणत शरद पवारांनी फरारी आरोपीला साताऱ्याच्या महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन यशवंत विचारांची चेष्टा केली असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…विनायक राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका; म्हणाले, “फूस झालेली लवंगी फटाके…”

आज त्यांनी बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने ३०० रुपये स्क्वेअर फुटाने खरेदी केलेल्या गाळ्याबाबतची कागदपत्रे सादर केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले, त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची अर्थातच शरद पवार यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायचा अधिकार नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे आहे.

हेही वाचा…मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले

नरेंद्र पाटील यांनीही दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती त्यामुळे या विषयावरून शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena s mahesh shinde criticizes sharad pawar for nominating shashikant shinde as a candidate in satara psg
Show comments