मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट झाली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात होते. मात्र आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देत असताना दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संजय शिरसाट म्हणाले, “मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही सहावी भेट आहे. राजकीय चर्चा झाली नाही, अशा बातम्या समोर आल्या. पण माझे मत आहे की, राजकीय चर्चा झाली पाहीजे आणि राज ठाकरे सुद्धा महायुतीत आले पाहीजेत.”

हे वाचा >> राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा भेट; नेमकी चर्चा कशावर? तर्क-वितर्कांना उधाण

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!

काय म्हणाले संजय शिरसाट?

औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत ४५ हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे.”

फेब्रुवारी महिन्यात निर्णय?

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच या सर्व घडामोडी होऊ शकतात. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, राज ठाकरे महायुतीत असावेत. पण हा निर्णय तीनही पक्षांच्या वरिष्ठांच्या हातात आहे. मला वाटतं पक्षश्रेष्ठी हिताचा निर्णय घेतील. पण तो निर्णय महायुतीला बळकटी देणारा असेल.

दरम्यान काल (दि. २९ डिसेंबर) वर्षा या निवासस्थानी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली असल्याची माहिती माध्यमातून समोर आली. यावेळी मराठी पाट्या, टोल नाके आणि धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते.

Story img Loader