शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन दुसरीकडे साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनाची जंगी तयारी करण्यात आली आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “भगवं उपरणं घातलं म्हणजे शिवसैनिक होतं का?”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जी वाटचाल झाली, त्या काळातील घटना आजही डोळ्यासमोर येतात. इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. शिवसैनिकांनी त्रास सहन केला. अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. आज जे काही नेते आहेत किंवा मंत्री झाले आहेत, ते शिवसैनिकांच्या जीवावर झाले आहेत”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ते एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलत होते.

tamil nadu cm mk stalin appointed his son udhayanidhi as deputy chief minister
अन्वयार्थ : घराणेशाही कालबाह्य!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
sushma andhare replied to amurta fadnavis
Sushma Andhare : “त्या आमच्या लाडक्या भावजय, पण कधी-कधी…”; सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीस यांच्यावर पलटवार!
Kolhapur hasan mushrif marathi news
गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…
Former MP Rajan Vikhare criticizes Chief Minister Eknath Shinde
लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
leaders pay tributes for Sitaram Yechury
Sitaram Yechurys Death : ‘डाव्या पक्षांचा आवाज हरपला’

हेही वाचा : “छगन भुजबळ पक्ष सोडणार, त्यांच्याबरोबर…”, रोहित पवारांचा दावा; पक्षांतराची वेळही सांगितली

‘शिवसेना ही निष्ठावतांची आहे. दुसरी शिवसेना (शिंदे गट) ही नकली शिवसेना आहे’, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊतांना शिवसेना काय माहिती आहे? संजय राऊत नोकरदार माणूस आहे. त्यामुळे त्यांना काय माहिती? भगवं उपरणं घातलं म्हणजे शिवसैनिक होतं का? असे अनेक पात्र शिवसेनेत येऊन गेले आहेत. अनेक लोक आले शिवसेनेचा फायदा घेतला आणि गेले. संजय राऊतांचा एक आंदोलनातील फोटो आहे का? त्यांनी कधी लाठ्या काठ्या खाल्ल्या का? पण त्यांना बोलायला आता वाव मिळायला लागला आहे. नेते म्हणून त्यांना हार घालावा लागतो हे शिवसैनिकांचं दुर्देव आहे”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.

संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करताना म्हटंल होतं की, लाचारी ही शिंदे गटाची मजबूरी आहे, तर खोके हे शिंदे गटाचं इमान आहे. त्यांच्या या टिकेला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, “कोण लाचार आहे? सिल्व्हर ओकवर पाया पडायला आम्ही जातो का? तुमच्या बैठकी होतात तेव्हा स्थळ बदलंत. तुमच्या खुर्च्या बदलतात. मग लाचार कोण? आज आम्ही ४०-५० लोक असूनही मुख्यमंत्री आमचा आहे. आज एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढते, हीच ठाकरे गटाची पोटदुखी आहे”, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.