शिवसेनेत पडलेल्या फुटीला आणि राज्यातील महायुतीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या काळातील कामासंदर्भात भाष्य केलं आहे. ‘विचार..विकास..आणि विश्वास… राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली’, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत ‘आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे’, असा खोचक टोला लगावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा